छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि.२०) घेण्यात आला. यामुळे शहरातील नागरिकांना आता २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपल्या मालमत्ता नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सभेत हसूल मधील भूमाफियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने महापौर समीर राजूरकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
१ मे ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव
सोमतीनगर महलगरपालिका छत्रपती संभाजीनगर
ठेवण्यात आला होता. सभेत चर्चे नंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यावेळी बालाजी मुंडे, सुरेंद्र कुलकर्णी, ओसामा अब्दुल कदीर, काकासाहेब काकडे, त्र्यंबक तुपे, अनिता घोडेले आणि किशोर नागरे यांनीही चर्चेत सहभाग घेत विविध मुद्दे उपस्थित केले. विजय औताडे यांनी काही लेआऊटमध्ये चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी करण्यात आल्याचे निदर्शनास
महसुलात वाढ
▶ गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेमुळे महापालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. २०२४-२५ या वर्षात ५५.४६ कोटी रुपये, तर २०२५-२६ मध्ये तब्बल ७७.१३ १३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. वाढती प्रतिसादाची संख्या लक्षात घेता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आणखी महसूल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात
आणून दिले. यावर नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी आकडेवारी सादर केली. त्यांच्या माहितीनुसार, २०२४-२५ या वर्षात ३८६२ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३३१७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या प्रक्रियेतून महापालिकेला ५५
कोटी ४६ लाख रुपयांचा महसूल मिळाला. तर २०२५-२६ या वर्षात ९७७८ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ९३०१ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि ७७ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल मिळाला. या सर्व चर्चे नंतर अखेर मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















